अंबाजोगाई/ प्रतिनिधी : घाटनांदूर येथील श्री सोमेश्वर शिक्षण संस्थेच्या अमृतमहोत्सवा निमित्त विद्यार्थी केंद्रस्थानी मानून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना अत्यावश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांचा बौद्धिक, मानसिक, गुणात्मक व सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सोमेश्वर शिक्षण संस्थेने विद्यार्थीकेंद्री अमृतमहोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे.

संस्थेच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने स्कुलबस लोकार्पण सोहळा व कन्या प्रशालेच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन आदी उपक्रम राबवले असून याच मालिकेत यावर्षीपासून गणेशोत्सवा निमित्त श्री सोमेश्वर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

सण-उत्सवात बिभत्स विकृतीपेक्षा प्रबोधन अतिशय गरजेचे ठरत आहे म्हणून सोमेश्वराईत दि. 15 सप्टेंबर 2026 ते दि. 24 सप्टेंबर 2026 दरम्यान विविध विषयावर प्रेरणा, ऊर्जा, विचार व विवेकाचा जागर संपन्न होत आहे.

या व्याख्यानमालेत मार्गदर्शन करणारे मान्यवर –

  1. डॉ. ज्ञानेश्वर दराडे
  2. श्री गोरख शेंद्रे
  3. श्री संतोष मोहिते
  4. श्री अमृत महाजन
  5. प्रा. सविता बुरांडे
  6. श्री अमृतेश्वर स्वामी

संस्थेने अमृतमहोत्सवा निमित्त वर्षभर विद्यार्थीहितासाठी शिक्षणाभिमुख, विधायक व दिशादर्शक उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे.