घाटनांदूर/प्रतिनिधी : तालुक्यातील घाटनांदूर येथील 35 वर्षीय युवक राजाभाऊ जोगदंड यांनी सोमवारी दि. 21 सकाळी आपली जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.यामुळे घाटनांदूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राजाभाऊ यांनी आपल्या राहत्या घराच्या आडूचा आश्रय घेत टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमागचे कारण अद्याप समजू शकले नाही, पोलीस अधिक तपास करत आहेत. मानसिक तणाव जाणवत असल्यास मदतीसाठी संपर्क करा – Kiran Helpline: 1800-599-0019
