केज तालुक्यातील राजेगाव येथील रहिवासी असलेले महादेव मेटे हे एक सामान्य कुटुंब असून त्यांच्या पत्नी सौ. जयश्री मेटे यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. पत्नीच्या निधनानंतर त्यांचा लहान मुलगा किशोर मेटे यांचे लग्न करून त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केली. मागील आठवड्यात महादेव मेटे यांचा थोरला मुलगा विजय व सौ. अंजली यांना चि. शंभू याचा जन्म झाला तर त्यांना मोठी मुलगी कु. हिंदवी ही आहे. महादेव मेटे यांचा लहान मुलगा किशोर व सौ. ऋतुजा मेटे यांना एका गोंडस कन्यारत्न कु. तुळजा ला जन्म दिला. या आनंदात आजोबांनी 1987 च्या आपल्या शाळेतील मित्रांना बोलावून स्नेहभोजन दिले.

मित्रांसोबत आनंद उत्सव

त्या दोन्ही नातवंडांचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आजोबा महादेव मेटे यांनी १९८७ च्या त्यांचे एस.एस.सी. चे वर्ग मित्र असलेले शासकीय गुत्तेदार दत्ता देशमुख, व्यापारी संजय शेळके, विनोद पोपळे, केंद्र प्रमुख संजय चवरे, मुख्याध्यापक बाबासाहेब केदार, पर्यवेक्षक मुरलीधर ठोंबरे, इंदर मुंडे, बाळासाहेब वायबसे, इं,द्रमोहन कराड, पांडुरंग महाकुंडे, अय्युब शेख, वाल्मीक गायकवाड, मनोज घोरपडे, अफसर काझी, सिद्धार्थ ठोंबरे, दिगंबर भुतकर, आसराजी दांगट, संजय बोबडे, पत्रकार गौतम बचुटे यांच्या सोबत स्नेह भोजन करून आनंदोत्सव साजरा केला.