घाटनांदुर /प्रतिनिधी : तालुक्यातील घाटनांदूर येथील ४० वर्षीय संदीप पांडुरंग गोदाम या बांधकाम मजुराने राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. १८) पहाटे उघडकीस आली.
ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. मयत संदीप गोदाम यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व दोन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. मानसिक तणाव असल्यास मदतीसाठी Kiran हेल्पलाइन 1800-599-0019 वर संपर्क साधा.
