अंबाजोगाई:शहरातील अतिशय गजबजलेल्या सावरकर चौकात भरदिवसा चोरीची धक्कादायक घटना घडली आहे.

याबत सविस्तर माहिती अशी की, काळवटी तांडा येथील शेतकरी रावसाहेब पांडुरंग राठोड (वय ५० वर्षे) हे आपल्या कामानिमित्त ९० हजार रुपये घेऊन निघाले होते. त्यांनी सदरील रक्कम आपल्या स्कुटीच्या (क्रमांक MH 44 P 1362) डिक्कीत ठेवली होती. दरम्यान, त्यांनी बसस्थानकासमोरील गायत्री लॉजजवळील एका हॉटेलसमोर आपली गाडी लावली आणि ते चहा पिण्यासाठी व जवळील हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले. अवघ्या काही मिनिटांतच अज्ञात चोरट्याने डिक्की उघडून ९० हजार रुपये लांबविले.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी दि. १८ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

📲 बीड जिल्ह्याची प्रत्येक ब्रेकिंग बातमी सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा 👇
https://chat.whatsapp.com/Ja2ntceXYLKEVF56sbnHn1