वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
अंबाजोगाई (प्रतिनिधी): तालुक्यातील अंजनपूर येथील रहिवासी अमोल श्रीरंग जोगदंड (वय २२ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवारी ( दि. २२) सायंकाळीअचानक निधन झाले. ऐन उमेदीच्या वयात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे अंजनपूर परिसरासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अमोल झोपलेले असताना झोप येतेस त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी सकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंजनपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, ग्रामस्थ तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.अमोल यांच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.
